🍀 एरंड वनस्पती 🍀
🌿 कोणत्याही ठिकाणी व कोणत्याही ऋतूत आणि कमी पाण्यात एरंडाचे झाड वाढते. या झाडाचे मूळ , कफ ,खोकला, ज्वर, दमा, तसेच कंबरेतील वेदना दूर करते. एरंडाच्या बियांत तेल असते आयुर्वेदात एरंडमूळ व बियांचा उपयोग बऱ्याच व्याधींमध्ये होतो विशेषतः वातव्याधी मध्ये झालेला दिसून येतो.
🌿पोटात व आतड्यात अपचन आणि जो वायू धरतो तो दूर करणे, तसेच पोटात उत्पन्न होणारा वायू व आम दूर करण्याचे काम देखील मूळ करते . पोटात व आतड्यात एरंडाच्या मुळात सौंम्य व सारक हे गुण असल्यामुळे ह्याची मदत होते.
🌿९५% रोग बरे करण्यात या औषधाचे ,मूळ उपयोगी पडते. तर कंबर ,पाठ, पोट, आणि योनी , यांच्यासंबंधी वात विकारात हे अप्रतिम गुण असलेले औषध आहे.
एरंड मुळांच्या काढ्यात जवखार घालून दिला म्हणजे कफाचे आजार ,उरातील व पाठीतील दुखणे बरे होते , तसेच गरोदर स्त्रीला वायूचा त्रास होऊ नये व प्रसूतीच्या वेळी कष्ट होऊ नयेत. म्हणून एरंडमूळ व सुंठ व बाळंत शेपाचा काढा देण्याची पद्धत आहे.
🌿शरीराच्या इतर अवयवांपेक्षा आतड्यांवर व सांध्यांवर एरंडाचा सर्वात जास्त प्रभाव पडतो.
🌿एरंड वनस्पती च्या बियांपासून तेल उत्पन्न होते त्यास गंधर्व किंवा एरंडतेल असे म्हणतात. एरंड तेल अतिशय बहुगुणी असते अंगास लावण्यास , पोटातून देण्यास तसेच डोके व तळ पायांना ही शांतता देण्यास मदत करते.
🌿पोटासंबंधी कोणत्याही विकारावर एरंड तेल हे एक रामबाण औषध आहे.
अगदी लहान मुलांनासुद्धा मध व एरंडतेल योग्य प्रमाणात दिल्यास , अडकलेला मल सहजरित्या बाहेर पडण्यास मदत होते.
एरंडाचा कावीळ या आजारांवर फार चांगला उपयोग झालेला दिसून येतो. गोड्या एरंडाची पाने बारीक वाटून त्याची साधारण बोराएवढी गोळी करुन दुधात कालवून घ्यावी साधारण एक दोन आठवड्यात कावीळ बरी झालेली दिसून येते. तसेच कावीळ या आजारात अंग पिवळे पडणे, नखं पिवळे पडणे , लिव्हरला सूज येणे असे सर्वसाधारण लक्षण दिसून येते अशा वेळी एरंडाचे पान व मेंदीचा पाला एकत्र वाटुन तो दुधात मिसळावा व ते दूध रोज सकाळी व संध्याकाळी प्यावे किंवा सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे.
🌿कधीकधी पोटात बारीक बारीक व राहून राहून दूखत असेल , तर भूक लागत नाही कारण अशा वेळी अन्नाचे व्यवस्थित पचन झालेले नसते त्यावेळी देखील एरंडाचा चांगला उपयोग झालेला दिसून येतो.
🌿अस्वस्थ वाटणं, अपचन, करपट ढेकर, अन्नावरची इच्छा उडणे, अशावेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करून त्यात हिंग, काळे मीठ व सुंठीची पूड घालून द्यावे अशाने ही लक्षणे दूर होतात.
सांधेदुखी, सांध्यांच्या ठिकाणी सूज येणे. उठताना बसताना त्रास होणे, चालताना गुडघे दुखणे, अशावेळी एक तोळा एरंड तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून खावी असे केल्याने वाताचे शमन होऊन दुखणे कमी होते.
🌿तसेच सारखा श्वास लागणे छाती भरून आल्याप्रमाणे वाटणे अशा वेळेस एरंड तेल व मध एकत्र करून घेतलास बरे वाटते कारण असे केल्याने कोठा साफ होतो व मलाची शुद्धता झाल्यामुळे श्वास कमी होतो.
🌿नाकातून वारंवार पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा कफ येणे, तसेच श्वासाला घाण वास येणे शिवाय कधीकधी नाकातून रक्त पडणे, गंध नाहीसा होणे अर्थात वास न कळणे. अशावेळी एरंडेल तेल व थोडे तूप एकत्र करुन नाकात वरचेवर घालीत रहावे असे केल्याने बऱ्यापैकी त्रास कमी झालेला दिसून येतो.
🌿कंबर दुखी , चमका मारणे, वाकता न येणे, अशावेळी एरंडमूळ व सुंठ यांचा काढा करावा काढ्यात दोन ते तीन गुंजा जवखार टाकावा व तो रोज घ्यावा.
अशाप्रकारे एरंड या वनस्पतीचे बहुगुणी उपयोग आपण पाहिले,
*सगळ्या वाचकांना नम्र निवेदन असे आहे कुठल्याही वनस्पतीचा उपयोग करून घेत असतांना, वैद्यांचा सल्ला नक्की घ्यावा. वैद्याच्या सल्ल्यानुसारच औषध घ्यावे*.
मोफत सल्ल्यासाठी तुम्ही अप्रत्यक्षरीत्या मेसेज किंवा कॉल करू शकता.
तसेच तुमच्या रोगाबद्दल काही शंका असल्यास प्रत्यक्षरीत्या भेटही देऊ शकता आमच्या दोन्ही शाखेचा पत्ता खाली दिलेला आहे.