बेलफळ शरीराला शीतलता, मेंदूला तजेला व हृदयाला बळ प्रदान करते.
अर्धे पिकलेले अर्धे कच्चे बेल फळ भूक व पचनशक्ती वाढविणारे तसेच जंतांचा नाश करणारे आहे.
बेल व त्याच्या सरबताच्या सेवनाने उन्हाळ्यात उष्णतेचा भीषण प्रकोप सहन करण्याची शक्ती येते.
उन्हाच्या झळा लागल्यावर बेलाच्या सरबतात लिंबाचा रस व थोडेसे मीठ घालून पाजावे.
बेलाचे घरगुती उपाय...
1.बेलाचा १०-२० ग्रॅम गर खाल्ल्याने मासिक स्रावात कधीकधी अधिक प्रमाणात पडणारे रक्त नियंत्रित होते.
2.बेलाचा गर, लोणी व मध मिसळून दररोज सकाळ-सायंकाळ सेवन केल्याने शारीरिक शक्ती वाढते, धातू पुष्ट होतो.
3.रात्री १०-२० ग्रॅम बेलाचा गर पाण्यात भिजत टाकावा. सकाळी चांगले कुस्करून व गाळून घ्यावे. हे पाणी गरजेनुसार खडीसाखर मिसळून प्यावे. यात लिंबचा रसही टाकू शकता. यामुळे भूक चांगली लागते.
4.उन्हाळ्यात निम्न रक्तदाबाच्या रुग्णाचा जीव घाबरा झाल्यास थोडेसे सैंधव मीठ व आल्याचा रस मिसळून बेलाचे सरबत पाजल्याने खूप लाभ होतो.
5.१०-१० ग्रॅम बेलाचा गर व धणे तसेच ५ ग्रॅम बडीशेप रात्री पाण्यात भिजत टाकावी. सकाळी चांगले कुस्करून व गाळून सेवन केल्याने थोड्याच दिवसात स्वप्न दोषांमध्ये लाभ होतो.
अल्सरसाठी फायदेशीर-
बेलामध्ये फेनोलिक तत्वासोबतच अँटीऑक्सीडेंट असते. त्यामुळे बेलाचे शरबत गॅस्ट्रिक अल्सर दूर करण्यास मदत होते. एवढेच नव्हे, याच्या सेवनाने अॅसिडीटी संतुलित राहण्यास मदत होते.
पचनसंस्थेचे रोग -
पिकलेल्या बेलफळाचा गर काढून तो सावलीत सुकवावा. त्यानंतर वाटून त्याचे चूर्ण बनवावे. हे चूर्ण सहा महिन्यांपर्यंत उपयोगात आणले जाऊ शकते. हे पाचकतत्त्वांनी परिपूर्ण असते. आवश्यक वाटल्यास २ ते ५ ग्रॅम चूर्ण पाण्यात मिसळून घेऊ शकता.
कच्चे बेलफळ भूक पचनशक्ती वाढविणारे तसेच कृमींचा नाश करणारे असते. हे मलासह वाहणाऱ्या जलीय अंशाचे शोषण करणारे असल्याने अतिसारात अत्यंत हितकार आहे.
कलेक्टेड इन्फर्मेशन...
ज्यांना नुकतीच शुगर ला शुरुआत झालेली आहे कीव्हा मागील पाच वर्षा पासून ज्यांची शुगर जेवणानंतर 250 पर्यंत आहे.अश्या रुग्णांची शुगर आयुर्वेदिक जड़ी बूटी औशधिंनी नॉर्मल होऊ शकते. शुगर ही बीमारी जशी जशी जुनी होत जाईल ,नंतर शुगर नॉर्मल होण्याची शक्यता कमी असते.
डॉ .श्री .नितिन जाधव .संजीवन चिकित्सक. डोंबिवली. 9892306092.