घर्षणाने जीर्णशीर्ण झालेला वयोमानाने उद्भवणारा मानेचा आजार म्हणजेच सर्व्हायकल स्पॉंडिलायसीस. सर्वप्रथम हा आजार सुरू होताना दोन
मणक्यांच्या मध्ये असणारी गादी (डिस्क)मधील पाण्याचे प्रमाण कमी होण्यास सुरू होते. त्यामुळे त्यातील असणारे कार्टीलेज मणक्याच्या बाहेर निघून
मज्जारज्जूवर दबाव टाकायला सुरुवात करते. अगोदरच मज्जारज्जू हा मणक्यातील एका छोट्या कॅनेलमधून कंबरेपर्यंत खाली गेलेला असतो. त्यावर मणक्यातून ही गादी सरकल्यामुळे मान दुखणे व त्याच प्रमाणे एक किंवा दोन्ही हातांमध्ये वेदना होणे, हातांमध्ये मुंग्या येणे व सुन्नपणा येणे अशी
लक्षणे दिसून येतात.
गादी सरकण्याची (स्लीप डिस्क) कारणे
*अचानक मानेला झटका लागणे.
* स्थूलपणा
* मणक्याला झालेला अपघात
* मानेला असलेला ताण
* वयोमानानुसार मणक्यांची झीज
*अचानक वजन उचलण्यामुळे व
*मणक्यातील सरकलेली गादी
आजारातील लक्षणे ः
कंबरेचे स्नायू खूप जास्त खेचलेले असतात.नजिकच्या भूतकाळात रोग्याने खूप वजन उचललेले असते.अति खोकल्यानेही हा आजार उद्भवू शकतो.अचानक मान वाकडी करणे अथवा मानेला झटका बसणे.
वेदना ः
*साधारणतः मानेमध्ये किंवा कंबरेमध्ये.
*मानेचे दुखणे डोक्याकडे, दोन्ही काखांकडे व हातापर्यंत सरकत जाते.
*अशा प्रकारचे दुखणे असह्य असते.
*वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली खोकणे, शिंकणे, चालणे किंवा समोर
*झुकणे यामुळे या प्रकारचे दुखणे वाढू शकते.
*आराम केल्याने वेदना कमी होतात.
*हातामध्ये किंवा पायामध्ये मुंग्या येतात किंवा सुन्नपणा येतो.
तपासण्या ः
मानेची क्ष-किरण तपासणी
सिटी स्कॅन
एम.आर.आय. स्कॅन. ही अतिशय महत्वाची तपासणी असून आपल्याला गादी किती सरकली आहे याची कल्पना येते. त्याचप्रमाणे मानेपासून
हातांमध्ये येणाऱ्या दबावाचे किती प्रमाण आहे हे या तपासणीत नमूद होते.
उपचार ः
साधारणतः 8 ते 12 आठवडे पूर्ण आराम करावा लागतो.
शक्यतो हाडासारखा कडक भाग झोपण्यास घ्यावा.
अतिशय तीव्र स्वरुपाच्या
आजारामध्ये डोक्याला ट्रॅक्शन लावून फिजियोथेरपी करता येते.
मानेचा सांधा जोडणे ः
ही मानेच्या मणक्यातील शस्त्रक्रिया असून मणक्यातील सरकलेली गादी काढून टाकण्यात येते. ही शस्त्रक्रिया साधारणतः समोरून मानेकडे केली जाते. या शस्त्रक्रिये
मध्ये बरेचदा दुर्बिणीचा वापरही केला जातो. दबाव निघाल्यानंतर दोन मणक्यांच्यामध्ये हाडांचा तुकडा किंवा कृत्रिम केज बसवली जाते व वरच्या आणि खालच्या मणक्यांना प्लेट आणि स्व्रूाच्या सहाय्याने बांधले जाते. यालाच सर्व्हावल फ्युजनही म्हणतात. पण ही शस्त्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. आजच्या घडीला या आजारासाठी सर्वात नवीन उपचार पद्धती आहे. यामध्ये दोन मणक्यांच्या मध्ये सरकलेल्या गादीच्या जागी कृत्रिम सांध्याचे
प्रत्यारोपण केले जाते. अशा प्रकारचा सांधा दोन मणक्यांच्यामध्ये टाकल्यामुळे
मानेच्या सर्व प्रकारच्या हालचाली योग्य प्रकारे होत राहतात. त्यामुळे
मणके एक दुसऱ्यांना बांधण्याची गरज राहत नाही. त्याचप्रमाणे मणक्याच्या मध्ये हाडाचे तुकडे किंवा प्लेट व स्व्रूा वापरायची गरज लागत नाही. पण ही
उपचार पद्धती अशा प्रकारे अशाच व्यक्तींना वापरण्यात येते. ज्यांना खूप जास्त शारीरिक हालचाल करण्याची गरज भासते.
मानेच्या सर्व प्रकारचे हालचाली व्यवस्थित राहतात.आजूबाजूच्या मणक्यांशी कमी घर्षण होते.बोन ग्राफिटींगची गरज लागत नाही.ऑपरेशनच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मानेची हालचाल सुरू होते.आपले सामान्य आयुष्य लवकरात लवकर सुरू करता येते.
तेव्हा मानेच्या या आजारामध्ये सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट ही उाची सर्वात अभिमत उपचार पद्धती असण्यास हरकत नाही.
डॉ. श्री. नितिन जाधव .संजीवन चिकित्सक . डोंबिवली .9892306092.