आधुनिकीकरणाच्या 🏭 ओघात गावांचे आणि शहरांचे काँक्रिटीकरण 🏗️ झाल्याने वटवृक्षाचे अस्तित्व जवळपास संपत आले आहे. कुठेतरी दूरवर एखादा वटवृक्ष आढळतो आणि त्याची पूजा 🙏🏻करण्यासाठी महिलांची रांगच रांग लागते.
हजारो वर्षांपासून वडाने आयुर्वेदात उत्तम स्थान मिळविले आहे. वडाचे झाड 🌳 मिळाले नाही, तर त्याची फांदी आणून त्या फांदीलाच फे-या घेण्याची वेगळीच प्रथा आता सुरू झाली आहे. केवळ फांद्या आणून त्यांची पूजा करण्याऐवजी जागोजागी वटवृक्षाची 🌳लागवड केली, तर त्याचा फायदा नक्कीच होईल.
💁🏻♀️ *गुणकारी वटवृक्ष नेमका कोणत्या कारणांसाठी उपयोगी आहे, ते बघुयात.*
*01) आगीने 🔥 भाजले* असल्यास त्यावर दह्यात वडाची वाळलेली पाने 🍂 वाटून लावल्यास दुखणं कमी होते आणि जखमही लवकर बरी होते.
*02) केसांचे आजार:*
वडाच्या वाळलेल्या पानांची 🍂 20 ग्रॅम राख 100 मिलिलिटर जवसाच्या तेलात मिसळून कोमट करून डोक्यावर मालिश केली असता केसांचे आजार दूर होतात.
*03) नाकातून 👃🏻 रक्त येणे:*
3 ग्रॅम वडाच्या पारंब्यांची पावडर दुधाच्या 🥛 सायीमध्ये टाकून पिल्यास रक्त येणे बंद होते. वडाच्या दुधाचे (चिकाचे) दोन थेंब नाकात टाकल्यास नाकातील रक्तस्त्राव बंद होतो.
*04) अधिक झोप 🥱 लागणे:*
वडाच्या वाळलेल्या पानांची 🍂 10 ग्रॅम पूड 1 लीटर पाण्यात 💦 मिसळून पाणी उकळून 🫕 घ्यावे. 1 लीटर मधील 25 टक्के पाणी होईपर्यंत ते आटवावे. राहिलेल्या पाण्यात एक चिमूट मीठ टाकून पाणी सकाळ संध्याकाळ पिल्यास आळस आणि अतिझोप कमी होते.
https://chat.whatsapp.com/Hmh4uI5UPWfI2ce3Y15e4B
*05) सर्दी 🤧, ताप 🤒, डोकेदुखी 🤕:*
वडाची तांबूस पाने 🍂 सावलीत सुकवून वाटून घ्यावीत. अर्धा लीटर पाण्यात अर्धा चमचा वाटलेली पूड टाकून पाणी उकळून 🫕घ्यावे. अर्धे पाणी आटल्यानंतर त्यात तीन चमचे 🥄 साखर टाकून सकाळ 🌅- संध्याकाळ 🌄 चहाप्रमाणे पिल्यास सर्दी, ताप आणि डोकेदुखीला आराम मिळतो.
*06) हृदयरोग 🫁:*
10 ग्रॅम वडाची हिरवी कोवळी पाने 150 मिली पाण्यात मिसळून वाटून घ्यावी. ते पाणी 15 दिवस पुरेल अशा बेताने सकाळ - संध्याकाळ घ्यावे. त्यामुळे हृदयाचे 🫁 ठोके नियंत्रणात येतात.
*07) तळपायाला 🦶🏻भेगा पडणे:*
भेगा पडलेल्या ठिकाणी वडाचे दूध (चीक) लावून मालिश केल्यास भेगा भरून येतात.
*08) कंबरदुखी:*
वडाच्या दुधाने (चीक) कमरेला दिवसातून तीन वेळा मालिश केल्यास कंबरदुखी राहते.
*09) नपुंसकता:*
बत्ताशामध्ये वडाच्या दुधाचे 5 ते 10 थेंब टाकून दररोज सकाळ-संध्याकाळ घेतल्यास नपुंसकता दूर होते.
*10) स्वप्नदोष 💤:*
वडाच्या झाडाचे दूध (चीक) पहिल्या दिवशी एका बत्ताशावर एक थेंब, दुस-या दिवशी दोन बत्ताशांवर दोन - दोन थेंब, असे 21 दिवस वाढवत गेल्यास स्वप्नदोष नाहीसा होतो.
*11) उन्हाळी 🥵 लागणे:*
वडाच्या पानांचा 🍃 काढा करून 50 मिली पाण्यात 2-3 वेळेस घेतल्यास उन्हाळी दूर होते. हाच काढा याच पद्धतीने घेतल्यास डोकं 😧 जड झाल्यासही गुणकारी आहे.
*12) गर्भपात 🤰🏻होणे:*
वडाची सुकलेली साल दुधाच्या साईसोबत घेतल्यास गर्भपात होत नाही. 5 ग्रॅम वडाची सुकलेली साल बारीक वाटून त्यात थोडा मध घालून दिवसातून दोन वेळा घेतल्यास गर्भपात होण्यापासून मुक्ती मिळते.
*13) उलटी होणे (स्त्री):*
वडाच्या कोवळ्या पारंब्या बारीक उगाळून पिल्यास स्त्रियांना गरोदरपणात फायदा होतो.
*14) उलट्या लागणे:*
3 ते 6 ग्रॅम वडाच्या पारंब्या खाल्ल्यास उलटीचा त्रास नाहीसा होतो.
*15) मुळव्याध:*
20 ग्रॅम वडाची साल 400 मिली पाण्यात उकळून घ्यावी. 200 ग्रॅम पाणी राहण्यापर्यंत पाणी 🫗आटवावे. त्या पाण्यात 10 ग्रॅम तूप आणि साखर घालून गरम असताना खाल्ल्यास मुळव्याधीसाठी फायदा होतो.
*16) मधुमेह:*
20 ग्रॅम वडाची साल आणि पारंब्या यांचे बारीक मिश्रण करून अर्धा लिटर पाण्याचा आठवा भाग शिल्लक असेपर्यंत उकळून घ्यावे. थंड झाल्यानतर गाळून पिल्यास मधुमेहात फायदा होतो.
*17) तोंड येणे:*
30 ग्रॅम वडाची साल १ लीटर पाण्यात टाकून गुळण्या केल्यास तोंड आलेले जाते.
*18) जखम:*
जखम चिघळली असल्यास दररोज जखम पाण्याने स्वच्छ करून दिवसातून 3-4 वेळेस वडाचे दूध (चीक) टाकल्यास चिघळलेली जखम भरून येते.
*19) जखम (फाटणे, टाके पडतील अशी):*
फाटलेली जखम जुळवून घ्यावी. वडाची पाने गरम करून त्यावर घट्ट बांधून ठेवल्यास जखम लवकर भरून येते.
*20) नासीर:*
वडाचे दूध (चीक) आणि सापाची कात एकत्र करून त्यामध्ये कापूस भिजवून नासीर असलेल्या जागी ठेवल्यास दहा दिवसांच्या आत आराम मिळतो.
*21) फोड येणे:*
वडाचे दूध (चीक) फोडांवर लावल्यास फोड पिकून फुटतात. फोड फुटल्यानंतर कोवळी पाने आगीवर कोमट करून फोडांवर तेल लावून बांधल्यास फोड येणे थांबते.
*22) कोड येणे:*
रात्रीच्या वेळी वडाचे दूध (चीक) काढून कोड आलेल्या ठिकाणी लेप लावावा. आणि वडाची साल बारीक करून कोड आलेल्या ठिकाणी बांधल्यास सात दिवसात कोड कमी होते.
*23) गाठी येणे:*
वडाचे दूध (चीक) मोठे मीठ एकत्र करून गाठीवर लेप लावावा, त्यावर साल बांधावी सलग 7 दिवस दिवसातून 2 वेळा हा प्रयोग केल्यास गाठी येणे थांबते.
*24) खाज सुटणे:*
वडाची अर्धा किलो पाने बारीक वाटून घ्यावी, 4 लीटर पाण्यात पहाटे उकळून घ्यावे, तीन लीटर पाणी आटवावे, राहिलेल्या एक लीटर पाण्यात अर्धा किलो मोहरीचे तेल टाकून पुन्हा उकळून घ्यावे. उकळताना भांड्यात केवळ तेल जमा होईल. तेल जमा झाल्यास ते खाज सुटलेल्या ठिकाणी लावल्यास ओली आणि कोरडी खाज कमी होते.
*25) दातांची मजबुती:*
नवीन आलेल्या फाद्यांनी दात घासल्यास दात मजबूत होतात.
*26) दात किडणे:*
किडलेल्या दातांमध्ये वडाचे दूध (चीक) सोडल्यास कीड नष्ट होते.
*27) दात 😬 दुखी:*
10 ग्रॅम वडाची साल, कात आणि 2 ग्रॅम काळी मिरी बारीक वाटून दात घासल्यास दातदुखी कमी होते.
*28) सूज येणे:*
वडाच्या पानांवर तूप लावून सुजलेल्या ठिकाणी बांधल्यास सूज कमी होते.
*29) दमा:*
वडाची पाने जाळून पानांची राख 240 मिली पाण्यात टाकून खाल्ल्यास दम्याच्या आजारात लाभ होतो.
*संकलन*: आर्या देव