★★पाळीच्या तक्रारी★★
★Dysmenorrhea
"डॉक्टर पाळी चालू असताना ओटीपोटात खूप दुखतं.." अशी तक्रार घेऊन अनेक तरूणी रुग्णालयात येत असतात.
काही वेळा पाळी येण्याच्या आधीच्या आठवड्यापासूनच पोट , कंबर, पाय दुखणे सुरू होते.
वारंवार पेन किलर चा भडीमार होऊ लागतो.केवळ दुखणं थांबण्याची औषधे घेऊन रुग्णा कंटाळलेली असते.
पण या तक्रारींवर कायमस्वरूपी असा ईलाज होत नाही.
त्यामुळे काही मुलींनी दर महिन्याला होणाऱ्या या त्रासामुळे पाळीचा धसकाच घेतलेला असतो.
★★या तक्रारींवर आयुर्वेद शास्त्रामध्ये ठोस उपाय अन ईलाज नक्कीच आहे..!
★प्रथम या तक्रारी का उद्भवतात ती करणे बघूया -
1.कोरडे अन्न, वेफर्स, फरसाण यासारख्या कोरड्या म्हणजे रूक्ष पदार्थांचे सतत सेवन करणे.यामुळे शरीरात वात दोष वाढत जातो.
2.चायनीज पदार्थ, आंबवलेले पदार्थ , preservatives असलेले पदार्थ यामुळे शरीरात वाढणारे पित्त.
3.जेवणाच्या वेळा न पाळणे , सतत रात्री जागरण यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन न होता ते शरीरात तसेच अपाचित अवस्थेत पडून राहणे.
4.सतत काहीतरी खात राहण्याची सवय असल्याने अन्नपचन व्यवस्थित होत नाही, परिणामी अजीर्ण होत राहणे.
5.अपाचित अन्न शरीरात साठून राहिल्याने तसेच व्यायामाचा अभाव, दिवसा झोपणे अशा सवयी असल्यास वजन वाढणे म्हणजेच obesity (स्थूलपणा ) निर्माण होते.
6.स्थूलपणा निर्माण झाल्यामुळे विशेषतः ओटीपोटावरील मेद वाढल्यानंतर पाळीच्या तक्रारीही वाढत जातात. कारण त्याचा परिणाम गर्भाशयाच्या कार्यक्षमतेवर होत असतो.
7.वरील आहाराचे सेवन , व्यायामाचा अभाव व स्थूलपणा यामुळे PCOS - polycystic ovarian syndrome सारखे विकार होतात.यात पाळी मध्ये पोट दुखणे यासोबतच पाळी वेळेवर न येणे ही प्रमुख तक्रार असते.
सध्याच्या जीवनशैलीतील बदलांमुळे अभ्यास, करियर तसेच अनेक ताणतणाव यांना सामोरं जाताना आरोग्यावर यांचा नक्कीच विपरीत परिणाम होतो.
★★आयुर्वेद शास्त्र यावर जीवनशैली मध्ये करायचे बदल, औषधी उपाय योजना तसेच पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी हे उपाय सुचवते.
विशेषतः पंचकर्म चिकित्सेतील बस्ती या कर्मा द्वारे शरीरात वाढलेल्या वात व पित्त दोष यांवर योग्य अशी चिकित्सा होते व पाळीशी संबंधित तक्रारींवर कायमस्वरूपी असा ईलाज होतो.
©डॉ.श्वेता कुलकर्णी
M.D.आयुर्वेद, MA संस्कृत
श्रीविश्व आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय
डोंबिवली पूर्व
संपर्क - 9404216580, 9892103109