काही सामान्य माहिती आणि घरगुती उपाय..
1.मनाला येणारी सततची अस्वस्थता दीर्घ काळ व्यक्तीच्या आयुष्यात टिकली, तर त्याचे रूपांतर चिंतेमध्ये होऊ लागते. अशा वेळी पेशंट बऱ्याचदा डिप्रेशन च्या मार्गाने वाटचाल करताना दिसतात.
2.जीवनात कधी तरी निराश आणि उदास वाटन स्वाभाविक आहे, पण ही अवस्था दीर्घ काळापर्यन्त टिकून राहिली, आणि निरंतर तुम्ही उदासीन राहू लागलात म्हणजे ते डिप्रेशन असू शकत.
3.नकारात्मक विचारांमुळे शरीरात संप्रेरकांचे असंतुलन निर्माण होतात व स्वभाव धर्माच्या विरोधात अर्थात निसर्गाच्या विरोधात गेल्यामुळे मन नैराश्य ग्रस्त होत जातं.
4.डिप्रेशन मध्ये व्यसन कसलही लागू शकत..
5.डिप्रेशन'चे प्रमाण सर्वांत जास्त महिलांमध्ये आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलताना त्यांना अनेक प्रसंगाना दररोज सामोरे जावे लागते.
6.नैराश्य (डिप्रेशन) हे अनुवांशिकतेमुळे येऊ शकते. तसेच ते बाह्य वातारणामुळेही येऊ शकते. यासाठी घरातील वातावरणही कारणीभूत असु शकते.
7.नैराश्य ग्रस्त व्यक्ति खूप झोपतो किंवा झोप उडालेली असते. कोणताही आवाज त्याला सहन होत नाही. बेचैन वाटते. आत्महत्येचे विचार मनात येतात. काही जण आत्महत्या करायचा प्रयत्न करतात.
8.डिप्रेशनची प्रमुख तीन कारणे
मन उदास होणे,आंतरिक ऊर्जा कमी होणे,आयुष्य निरस वाटणे हे आहेत.
काही घरगुती उपाय..
1.डिप्रेशनच्या आजारात कुटुंबाचा व मित्रमंडळींचा मानसिक आधार खूप मोलाचा ठरतो.
2.डिप्रेशन सारख्या कोणत्याही मानसिक विकारात दीर्घ श्वास घेत राहिल्यास रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेवर याचा चांगला परिणाम होतो. त्यामुळे छातीवर येणारे दडपण व सतत होणारी धडधड नक्कीच कमी होते.
3.व्यायाम ही शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवणारी एक नैसर्गिक क्रिया आहे. म्हणून डिप्रेशन पासून दूर राहण्यासाठी स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवणे गरजेचे आहे.
4.मेडीटेशन केल्याने मेंदूमधील भावना व आठवणी कार्यान्वित होतात ज्यामुळे डिप्रेशनची लक्षणे नियंत्रित राहतात
5.ओंकाराचा ध्यान करत प्राणायाम करा. सुविचार करा. डिप्रेशन मध्ये फायदा होईल.
6.ब्राह्मी ,हींग ,शंखपुष्पी हया समान मात्रा मध्ये एकत्र करून चूर्ण तयार करा.रोज एक चम्मच पाण्यातून घ्या.
7.ज्ञान मुद्रा- अंगूठा आणि तर्जन ची टोके एकमेकाला लावा .बाकी बोटे सरळ ठेवा.डिप्रेशन कमी होण्यास मदत होईल.
8.250 मिलिलीटर दूधामध्ये दोन चमचे मध मिसळून दिवसातून दोन वेळा घेऊ शकता.
9.आपल्याला डिप्रेशन आले आहे, हे मान्य करणे, त्यानंतरच त्यावरील उपायांचा अधिक परिणाम दिसायला लागेल.
10.सतत कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करावा. नियमित प्राणायाम करणे किंवा एरोबिक्ससारखे व्यायाम प्रकार करावेत .
11.समुपदेशकाचा सल्ला न लाजता घ्या. गरज पडल्यास कौन्सिलरची मदत घ्या.
12.अश्वगंधा पाक दुधासोबत घ्या.
13.बेलाचे सरबत हे रस-रक्तादी धातूंची वृद्धी करते, हृदयाला उत्तम बळ प्रदान करते.डिप्रेशन मध्ये फायदे होतो.
14.डिप्रेशन मध्ये चमेलीच्या फुलांचा सुगंध मेंदूमधील उष्णता कमी करतो. डिप्रेशन साठी गुणकारी औषधि आहे.
15.डिप्रेशन मध्ये बादाम , जवस,
ग्रीन टी, नारियल, टमाटर, पालक, हे उपयोगी सिद्ध होऊ शकतात.
16.विटामिन डी युक्त पदार्थाचे सेवन करा..सकाळचा कोवळा सूर्य प्रकाश ग्रहण करा.
डॉ. श्री .नितिन जाधव .संजीवन चिकित्सक. डोंबिवली. 9892306092.