आज 24मार्च -World, Tuberculosis Day. TB भारताला काही नवा नाही.अगदी वेदीक काळापासून त्याचे वर्णन आढळते. वेदात यक्ष्मा म्हणून त्याचा उल्लेख आहे.परंतु आजाराचे गांभीर्य लक्षात घेता आयुर्वेदाने राजयक्ष्मा नाव दिले आहे.म्हणजे राजा येताना एकटा न येता लवाजम्यासह येतो तसे याबरोबरच इतर आजारही,उपद्रव (complications) देखिल होतात आज आपण Multi Drug Resistance TB,HIV infection अशा आव्हानांना तोंड देत आहोत.
पूर्वी TB मुळे मृत्यूचे प्रमाण भरपूर होते . परंतु आता नवनवीन अँटिबायोटिक्स च्या वापराने ते आटोक्यात आले आहे परंतु Multi Drug Resistance TB, यकृतावरील दुष्परिणाम (Hepato -toxicity)अशी नवी आव्हाने समोर आहेत.
या आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी काळाच्या कसोटीवर तपासले ली आयुर्वेदिक औषधे, आहार - विहार,पंचकर्म यांची जोड दिली तर 'सोने पे सुहागा ' अशी स्थिती निर्माण करता येते .
आयुर्वेद म्हटला की लोकांना वाटते आयुर्वेद मांसाहार निषिद्ध म्हणतो परंतु TB मध्ये मांसाहाराचे अनन्य साधारण महत्व आहे विशेषतः शेळीचे मांस.
जेष्ठमध,वसंत कल्प,अभ्रक भस्म, द्राक्षासाव, अश्वगंधा रिष्ट, वासावलेह अशी अनेक उत्तमोत्तम औषधे अप्रतिम कामे करतात (औषधे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी)
TB झालेल्या व्यक्तीने अंगाला औषधी तेलाने अभ्यंग करवून घ्यावा त्यानंतर जलावगाह(sitz bath) घ्यावा.
आहारात शेळीचे दूध,शेळीचे तूप+सुंठ, शेळीचा मांसाहार आवर्जून करावा
त्याकाळी सांगितलेले शेळीबद्दलचे पथ्य आजच्या Allopathy च्या जंतू शास्त्राच्या युगात तावून सुलाखून निघाले आहे. शेळ्यांना TB होत नाही असे आजचे मॉडर्न सायन्स सांगते .
TB झालेल्या व्यक्तीने असा आहार - विहार ३ वर्षे सांभाळला की TB चा पूनरुद्भव (Relapse) होत नाही.
आयुर्वेदिक औषधे आजच्या मॉडर्न मेडिसिन सोबत घेतल्याने यकृतावरील दुष्परिणाम (Hepato -toxicity) नष्ट करता येते, रोग प्रतिकरशक्ती वाढते आणि रुग्ण लवकर बरा होतो.
डॉक्टर गौरांगी करमरकर
एम डी आयुर्वेद (पंचकर्म)
tejasveeayurved@yahoo.com
8928399957
9323371818