सुवर्णप्राशन संस्कार
आयुर्वेदाने नवजात शिशू व बालकांच्या संगोपन व पालन पोषण ह्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे, आपल्या हिंदू धर्मात मूल जन्मल्यापासून त्यावर विविध संस्कार केले जातात, त्यात एकूण सोळा संस्कार येतात. बालरोग विज्ञान ह्या आयुर्वेदातील एका विभागात ज्या मध्ये मुलांचे आजार व त्यावरील उपचार ह्या संबंधी माहिती दिलेली आहे, त्यातदेखील ह्या सोळा संस्कारांचा उल्लेख आढळून येतो, त्यातीलच एक संस्कार म्हणजे सुवर्णप्राशन होय.
सुवर्णप्राशन हा बालकावर केला जाणारा एक महत्त्वाचा संस्कार आहे. ह्यात महिन्याच्या पुष्य नक्षत्रादिवशी आयुर्वेदामध्ये उल्लेखित मेध्य, बल्य, रसायन अशा औषधांसोबत मेध्य असे घृत, मध व त्यासह सुवर्ण भस्म मिसळले जाते व हे मिश्रण मुलांना पुष्य नक्षत्रादिवशी देण्यात येते. हे औषध साधारणतः नवजात बालकांपासून बारा वर्षापर्यंतच्या मुलांना देतात. त्या औषधाच्या नियमित सेवनाने मुलांची बौद्धिक क्षमता चांगली विकसित होते. धारणा शक्ती, स्मृति वाढते, रोगप्रतिकार शक्ति वाढते. त्यामुळे मुलांना वारंवार होणारे सर्दी, पडसे, ताप, पोटाचे विकार इ.मध्ये सुधारणा होते, मुलांची शारीरिक वाढ देखील चांगली होते असे दिसून आले आहे. पुष्यनक्षत्रादिवशीच हे देतात कारण ह्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यातही गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुवारी आलेले पुष्यनक्षत्र हे अत्यंत शुभ असते. ह्या पुष्य नक्षत्राचा त्या दिवशीच्या वातावरणावर असा काही चांगला प्रभाव पडतो की त्या दिवशी हे औषध मुलांना दिल्यास मुलांच्या शरीरावर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.
त्या औषधात वापरण्यात येणारी औषधे खालीलप्रमाणे :वचा, ब्राह्मी, शंखपुष्पी, गुडूची, अश्वगंधा, शतावरी, आमलकी, हरीतकी, बिभीतकी, पिंपळी इ.
ह्या औषधांचे परिणाम शरीरावर खालीलप्रमाणे होतात:
• वचा: म्हणजेच वेखंड. हे मेध्य कार्य करते म्हणजेच बुद्धिवर्धनाचे कार्य करते. वाक्शक्ती सुधारते म्हणजे शुद्ध शब्दोच्चार होण्यास मदत करते
• शंखपुष्पी: मेंदूचा कमकुवतपणा घालवते व मेध्य कार्य करते
• ब्राह्मी: मेध्य कार्य करते व स्मरणशक्ति आणि मेंदूची धारणाशक्ति वाढविते
• गुडूचि: रसायन कार्य करते
• अश्वगंधा: बल्य, रसायन व बृंहण कार्य करते
• शतावरी: बल्य, रसायन, मेध्य, चक्षुष्य कार्य करते
• पिंपळी: रसायन, फुफ्फुसांवर बल्य कार्य करते, मेध्य कार्य करते
• आमलकी: रसायन, बल्य, मेध्य कार्य करते
• हरितकी: बल्य, रसायन, चक्षुष्य कार्य करते
• बेहडा: धातुवर्धक कार्य करतो
• सुवर्ण भस्म: शरीराची रोग प्रतिकारशक्ति वाढविते, बौद्धिक क्षमता वाढविते
• घृत(गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप): शक्तिवर्धक व बुद्धिवर्धक
• मध: औषधाला चांगली चव देते व योगवाही म्हणजे औषधाचे गुण वाढविण्याचे काम करते
या औषधाचे सेवन मुलांना संडास, ताप, उलटी होत असल्यास करू नये
खालील दिवशी सुवर्णप्राशन शिबीर आयोजित केलेले आहे.
२८ जुलै २०२२ १८ ऑक्टोबर २०२२
२५ ऑगस्ट २०२२ १५ नोव्हेंबर २०२२
२१ सप्टेंबर २०२२ १२ डिसेंबर २०२२
० ते १६ वर्षांच्या बालकांना सुवर्णप्राशन दिले जाईल. या शिबिरात सामील होण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर आपल्या बाळाचे नाव नोंदवावे.
डॉ विलासिनी चौधरी
BAMS (MUMBAI), PGFCP (PANCHKARMA, PUNE), MA (SANSKRIT, PUNE)
९९३०१०८३१०
आरोग्यवर्धिनी फिजिओ-आयुर्वेद केंद्र, दुकान क्रमांक ५, फारु अबोडे, दगडी शाळा आणि खंडू रांगणेकर चौकाजवळ, देव चहाच्या गल्लीत, डॉ लाझरस रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०१